पंढरपूर : येत्या १५ जुलैपासून विठ्ठल मंदिर २४ तास खुले

गुरूवार, 12 जुलै 2018 (08:31 IST)
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर मंदिर समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. श्री विठ्ठलाच्या दर्नाशासाठी येणाऱ्या माळकरी, टाळकरी, प्रवचनकार, कीर्तनकार आणि प्रबोधनकार भाविकांची गर्दी लक्षात घेता येत्या १५ जुलैपासून विठ्ठल मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.  दरम्यान, मंदिर समितीच्या या निर्णयामुळे भाविकांना आता श्री विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्श दर्शन रांगेत जास्त वेळ ताटकळत उभे राहण्याची गरज नाही.
 
मंदिर समिताच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा १५ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधी दरम्यान असणार आहे. सध्या २४ तासांपैकी फक्त आठ तास मंदिर दर्शनासाठी खुले असते. आता मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांना पंचवीस तीस तास दर्शन रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती