सदर घटना 9 जानेवारी 2003 ची पालघर मध्ये विरार भागात बोलिंज -आगाशी येथील एका बंगल्यात चैघांनी घुसखोरी केली आणि घरातील सदस्यांना बांधून, चाकूचा धाक दाखवून ब्लॅन्केटने तोंड झाकून घरातील मौल्यवान सोने आणि 25 हजाराची रोख रक्कम पळवून नेली.
दरोडेखोरांनी शेजारच्या एका बंगल्यालाही लक्ष्य केले, मात्र तेथे कोणतीही मौल्यवान वस्तू सापडली नाही. विरार पोलिसांनी त्याच दिवशी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 394(दरोडादरम्यान स्वेच्छेने दुखापत करणे), 342 (चुकीने बंदिस्त करणे), 457 (घर फोडणे), 511 (फौजदारी गुन्हा करणे) अन्वये गुन्हा दाखल केला. कलम 34 (आत्महत्येचा प्रयत्न) आणि 34(सामान्य हेतू) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.
या प्रकरणात 2005 ,मध्ये एका आरोपीला अटक केली मात्र त्याचे तीन साथीदार फरार झाले.
अलीकडच्या काही महिन्यात मीरा-भाईंदर -वसई विरार गुन्हे शाखेने तपासात नवीन दृष्टीकोन आणला आणि आरोपी काळे जालना येथे एका गावात राहत असल्याचे आढळून आले. गुन्हे शाखेने जालनातील एका गावात आरोपीचा शोध लावला आणि त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात चौघे जण आरोपी होते. मात्र दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघे अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.