कोल्हापुरात अतिमुसळधार पावसामुळे ऑरेंज अलर्ट, पुणे -बंगळूर महामार्ग पाण्याखाली

शनिवार, 24 जुलै 2021 (16:20 IST)
मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे.कोल्हापुरातील पंचगंगा नदी ची पातळी वाढली असून सकाळी 55 फुट 6 इंचा पर्यंत झाली होती.सध्या कोल्हापुरात सर्वत्र पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
 
हवामान विभागाने कोल्हापुरात आज आणि उद्या साठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.सतत पावसामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला असून पुणे -बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.तसेच सांगली-कोल्हापूर बायपास मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद केले आहे.पन्हाळाचा रस्ता अक्षरश:वाहून गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालीआहे.
 
पंचगंगा नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे पुणे -बेंगळूर महामार्ग देखील बंद झाला आहे त्यामुळे अनेक वाहने रस्त्यावरच खोळंबली आहेत.पोलिसांनी हे मार्ग बेरिकेड्स लावून बंद केले आहेत.कोल्हापूर महामार्ग बंद केल्याने दूध पुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.NDRF ची दोन पथके कोल्हापुरात दाखल झाल्याचे वृत्त मिळत आहे.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती