कोकण विभागात रायगड,रत्नागिरी,पालघर,ठाणे,या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली.मुसळधार पावसाचा चांगलाच तडाखा बसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तसेच या पावसाचा फटका मुंबई - गोवा महामार्गालाही बसला आहे.चिपळूण येथे वाशिष्ठी पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या चार दिवसापासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनाच्या रंगाच रांगा लागल्या आहेत. चिपळूणचा वाशिष्टी पूल खचल्यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच कुंभार्ली घाट आणि आंबा घाटावर देखील दरड कोसळत असल्यामुळे येथील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून बंद आहे.