राज्यात तेरा ठिकाणी ढगफुटी

शनिवार, 24 जुलै 2021 (11:59 IST)
राज्यात गुरुवारी पावसाने कहर केला. एकाच दिवशी 13 ठिकाणी ढगफुटी झाल्याने खळबळ माजली आहे. आजवरचा हा उच्चांक असल्याची माहिती मिळत आहे.
 
पुणे आयआयटीएम हवामान खात्याचे तज्ज्ञ डॉ.किरणकुमार जोहरे सांगतात की साधारणपणे एका तासात 100 मिमी पावसाची नोंद झाली की त्याला ढगफुटी होणं असे म्हणतात.

गुरुवारी राज्यात जवळपास13 ठिकाणी ढगफुटी होण्याचे वृत्त समोर आले आहे.ताम्हिणी घाटात 468 मिमी, चिपळूण मध्ये 400 मिमी आणि महाबळेश्वरमध्ये 480 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
 
पिंपरी चिंचवडमध्ये देखील पावसाचा जोर ओसरला असून पवना धरण्यात गेल्या 24 तासात पाण्यात वाढ झाली. साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर सुरूच आहे.गेल्या तीन दिवसात येथे 579 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
 
पुणे हवामान खात्याचे तज्ज्ञ डॉ. किरण कुमार जोहरे सांगतात की एका तासात जर 100 मिमी पाऊस पडला तर त्याला जागतिक हवामान संघटनेच्या मापकानुसार ढगफुटी घोषित केले जाते.परंतु ग्रामीण भागात रडार सयंत्रणा नसल्याने पावसाचे मोजमाप करणे शक्य नसते.परंतु पावसाचे स्वरूप बघता राज्यात 13  ठिकाणी ढगफुटी झाल्याचे त्यांनी सांगितले.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती