विधानसभेत विरोधकांचा महिला सुरक्षेचा मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल

सोमवार, 3 मार्च 2025 (16:06 IST)
आज महाराष्ट्रातील अर्थसंकल्प अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी महिला सुरक्षेचा मुद्दा मांडत सरकारवर हल्लाबोल केला. आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारच्या कामावर टीका केली. 
ALSO READ: मोहन भागवतांना हाच प्रश्न विचारा, आरएसएस प्रमुख हिंदू नाहीत का?संजय राऊतांची एकनाथ शिंदेंना खोचक टीका
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत घडलेल्या घटनेवरून काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आणि सरकार ज्या घटनांना दाबत आहे ती सर्व प्रकरणे उघडकीस येतील. जर राज्यात केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सामान्य लोकांची काय अवस्था असेल याची कल्पना करता येते. स्वारगेट घटनेबरोबरच बीड आणि परभणीच्या घटनांना सरकारने दडपण्याचा प्रयत्न केला त्या सर्व घटना उघडकीस येतील. 
ALSO READ: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जितेंद्र आव्हाडांनी हातकड्या घालून निषेध करीत आवाज उठवला
या वर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राज्यातील केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नाही तर राज्यात सामान्य माणसांची मुलगी, महिला कसे सुरक्षित असणार? गेल्या 126 दिवसांत पुणे जिल्ह्यात 50 बलात्काराच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत, त्यामुळे जर आपण संपूर्ण राज्याबद्दल बोललो तर ही संख्या खूपच जास्त असेल.

या प्रकरणात काँग्रेस ने कायदा आणि सुव्यवस्थेला दोषी ठरवले आहे. रक्षा खडसे मुलीच्या गैरवर्तन प्रकरणात काँग्रेस खासदार रजनी पाटील म्हणाल्या, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी आहे.
ALSO READ: संजय निरुपम राऊतांच्या विधानावर हल्लाबोल करीत म्हणाले शिवसेना युबीटी हिंदुत्वाचा त्याग करत आहे
अशा कोणत्याही घटनेचे राजकारण करणे योग्य नाही. जे चूक आहे ते चूकच आहे. जळगाव मध्ये जर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबत अशी घटना घडू शकते तर सामान्य माणसांच्या मुलींचे रक्षण कोण करणार?पुण्यातील बस बलात्कार प्रकरण आणि बदलापूर घटनेत ते काय करतील?”
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती