शरद पवार हे पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी पवारांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तसेच शेतकरी मेळाव्यास देखील त्यांनी संबोधित केलं. मात्र, माझ्या हृदयात फक्त विठ्ठलाचे स्थान, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी विठूरायाच्या दर्शनानंतर दिली.
शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, देशात फार ठिकाणी मंदिरात जात नसतो. पण, काही मंदिर ही माझ्या अंत:करणात आहेत. त्यामध्ये पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीचं मंदिर सुद्धा आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने मानसिक समाधान मिळतं. विठ्ठल हा देशातील कष्टकरी सर्वसामान्यांचा दैवत आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून उन्हातान्हाचा विचार न करता, दर्शनासाठी याठिकाणी लोक येतात. त्यामुळे सामान्य माणसाला समाधान देणारे हे मंदिर आहे, असं शरद पवार म्हणाले.