महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच आणखी एक हजार शिवशाही बस येणार आहेत. त्यातील सुमारे ६०० बस एसटीकडून विकत घेतल्या जाणार आहेत.एसटीच्या ताफ्यात सध्या सुमारे एक हजार वातानुकूलित शिवशाही बस आहेत. त्यापैकी ५०० बस एसटीच्या मालकीच्या आहेत. तर उर्वरीत बस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही बस शयनयान सुविधा असलेल्या आहेत.
शिवशाही व्यतिरिक्त वातानुकूलित शिवनेरी, हिरकणी निमआराम, यशवंती मिडी, शितल निमआराम, वातानुकूलित अश्वमेध आणि साधी अशा विविध प्रकारच्या बस आहेत.