उल्लेखनीय आहे की ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी 3 ट्रेनच्या धडकेत 275 लोकांचा मृत्यू झाला तर 1100 हून अधिक लोक जखमी झाले. अपघातानंतर 51 तासांनंतर रविवारी रात्री उशिरा येथे रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली. वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, त्यांची जबाबदारी अद्याप संपलेली नाही. ओडिशा रेल्वे अपघातातील बेपत्ता लोक त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर सापडतील याची खात्री करणे हा त्यांचा उद्देश आहे. हे सांगताना रेल्वेमंत्री भावूक झाले.