ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शांताबाई लोंढे कोपरगावकर यांचा मदतीसाठी अनेक हात धावून आले. शांताबाई यांचा एक व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हे समजतातच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मदतीसाठी पुढाकार घेत. त्यांची भेट घेतली आणि त्यांना आर्थिक मदत करत वस्त्र भेट दिली. त्यांना श्री साईबाबांचे दर्शन करवून त्यांची सध्या राहण्याची सोया द्वारकामाई वृद्धाश्रमात करून आरोग्य उपचार व्यवस्था करून दिली. त्यांच्या सारख्या वयोवृद्ध कलावंतांना सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन कोल्हे यांनी दिले. शांताबाई या प्रसंगी म्हणाल्या, जरी मी आज वयोवृद्ध झाले आहे तरी माझी कला अजून तरुणच आहे.
शांताबाई यांची मदत करण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत माहिती दिली. त्या म्हणाल्या ज्येष्ठ कलावंत शांताबाई कोपरगावकर यांच्या वर उपासमारीची वेळ आहे आहे अशी माहिती सोशलमिडीयाच्या माध्यमातून मिळाल्यावर महिला आयोगाच्या वतीने तातडीने जिल्हा महिला बालविकास अधिकारी अहमदनगर यांच्याशी सम्पर्क करून शांताबाई यांना मदत पुरवण्यात आली.