सुटीच्या दिवशी करून केल्या ६० लाख नोटा नाशिकहून रवाना

सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (18:01 IST)
देशातील चलन तुटवडा भरून घेण्यासाठी नाशिकमध्ये असलेल्या करन्सी नोट प्रेसमध्ये कर्मचाऱ्यानी रविवारी सुटीच्या दिवशी कामावर येत कोणत्याही प्रकारचे वेतन न घेता काम केले आहे. त्यातून करन्सी नोट प्रेसमधून पाचशे, शंभर व वीस रुपयांच्या ६० लाख नोटा तयार करून ओझर विमानमार्गे केरळला पाठवण्यात आल्याची माहिती जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कामगार नेते ज्ञानेश्‍वर जुंद्रे, सुनील अहिरे, राजेश टाकेकर यांनी दिली आहे.
 
व्यवहारातून जुन्या नोटा रद्द झाल्यानंतर देशात असलेल्या मोजक्या नोटा छपाई कारखान्यांवर नोटा छापण्याचा प्रचंड ताण पडला आहे. यात नाशिक येथे असलेल्या करन्सी नोट प्रेसमधील कामगारांनी सलग दोन रविवार सुटी न घेता काम केले. त्यातच रविवारी कर्मचार्‍यांनी साप्ताहिक सुटीचे वेतन घेऊ नये, अशी अपेक्षा वित्त मंत्रालयातील प्रेस टाकसाळ महामंडळाने व्यक्त केली होती. याला कर्मचार्‍यांनी प्रतिसाद देत सुटीच्या दिवशी कामाला येत कोणताही आर्थिक मोबदला न घेता काम केले आहे.

वेबदुनिया वर वाचा