लेखक, दिग्दर्शक, गीतकार अशी ओळख असलेल्या अजेय झणकर यांचे निधन झाले आहे. पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात झणकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘लेकरु’ या चित्रपटाचे निर्माते आणि पटकथाकार म्हणूनही झणकर प्रसिद्धीस आले. ‘वडगावच्या लढाईत इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान 1779 सालीच पारतंत्र्यात गेला असता,’ असं सांगणारी ‘द्रोहपर्व’ ही त्यांची कादंबरी गाजली. ‘दोहपर्व’ कादंबरीवर ‘सिंग्युलॅरिटी’ हा हॉलिवूड चित्रपट तयार झाला. मराठी लेखकाच्या साहित्यकृतीवर बेतलेला हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट ठरला.