बालात्कार झाला नाही, साक्ष फिरवली मुलीला कोर्टाचा दणका

मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (08:46 IST)
बलात्कार झाल्याच्या आरोपाची साक्ष मुलीने फिरवल्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं तरुणीलाच चांगलेच झापले आहे. त्या तरुणीला पीडित म्हणून देण्यात आलेली नुकसान भरपाई परत कर असे आदेश सत्र न्यायालयानं दिले. हा या प्रकारचा पहिलाच निकाल ठरला आहे. २०१५ साली १७ वर्षीय मुलगी तिच्या शेजारी राहत असलेल्या मुलासोबत पळाली होती. तेव्हा  अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी घरी आल्यानंतर ती गर्भवती असल्याचं घरतील व्यक्तींना कळले होते तेव्हा बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याने तीला मनोधैर्य योजनेअंतर्गत २ लाख रूपये मिळाले. हा सर्व खटला न्यायालयात सुरू झाल्यानंतर या मुलीनं तिची साक्ष फिरवली, आणि आपल्यावर बलात्कार झालाच नसल्याचं न्यायालयात सांगितल आहे. त्यामुळे बलात्काराचा आरोप असलेल्या मुलावर आपलं प्रेम असून त्याच्यासोबत आपण लग्न केले आहे. आम्हा दोघांना एक मूल असल्याचंही तिने न्यायालयाला सांगितल यावर न्यायालयाने तीव्र नापसंती दर्शवली खोटी साक्ष दिली म्हणून समज देखील दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती