अंतराळातून दिसतोय स्टॅच्यू ऑफ युनिटी

सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (11:42 IST)
जगातील सर्वात उंच पुतळा असलेला 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' थेट अंतराळातून दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. गुजरातमधील सरदार सरोवरजवळ उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा अंतराळातून दिसत असल्याचे काही छायाचित्र समोर आले आहेत. उपग्रहांच्या माध्यमातून घेतलेल्या छायाचित्रातून ही बाब समोर आली आहे. ऑब्लिक्यू स्कायसॅटने 15 नोव्हेंबर रोजी 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा हा फोटो शेअर केला.
 
सध्या सोशलीडियामध्ये हा फोटो व्हायरल झाला आहे. हा पुतळा 597 फूट उंचीचा आहे. 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केले होते. संस्थानिकांना एकत्र करुन देशाची निर्मिती करण्यात सरदार पटेल यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सरदार पटेलयांचे हे भव्य शिल्प साकारण्यासाठी सुमारे 2 हजार 389 कोटी रुपयांचा खर्च आला. 
 
चीनमधील बुद्धांच्या पुतळा (153 मीटर) आणि न्यूयॉर्क शहरातील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (93 मीटर) यापेक्षा हा पुतळा उंच आहे. सरदार पटेल यांचे स्मारक असलेले 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'ला भेट देण्यास दररोज किमान 15,000 पर्यटक येतील, अशी अपेक्षा आहे. या सरकामुळे गुजरातधील पर्यटन व्यवसाय आणि रोजगार वाढेल, अशी राज्य सरकारला अपेक्षा आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती