चालत्या गाडीत चोरी झाल्याचे लक्षात येईपर्यंत गाडीने बरेच अंतर कापलेले असते. त्यामुळे गुन्हा नोंदविताना हद्दीचा मुद्दा समोर येतो. त्यामुळे नेमके ठिकाण समजेपर्यंत तक्रार नोंदविण्यातच वेळ वाया जातो. त्यामुळे प्रवाशांनी तत्काळ मोबाईल अॅपवरच गुह्याची तक्रार द्यायची अशा प्रकारचे नवीन अॅप विकसित केले जाणार आहे. अशा अॅपचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविला असल्याची माहिती आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली.