मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या

शनिवार, 25 मे 2019 (17:22 IST)
मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही आणि तसा काही प्रस्तावही नाही. मी एनडीएमध्येच आहे आणि राहणार,’ असं स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिलं आहे. एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत आले असताना आज त्यांनी महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ‘काँग्रेस प्रवेशाची चर्चा कुठून सुरू झालीय? माझी कुणासोबतही चर्चा झाली नाही. काँग्रेस प्रवेशाचा प्रश्नच नाही,’ असं राणे म्हणाले.
 
दुसरीकडे बुडत्या नावेत कोण जाईल, अशी मार्मिक टिपणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या काँग्रेससोबत जाण्याच्या चर्चेवर केली. मुख्यमंत्र्यांसह एनडीएचे दिग्गज नेते आज बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती