त्यामुळे आता एसटी महामंडळ कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांची गैरसोय करून संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी गमवावी लागणार आहे. निलंबनानंतर आता कायमस्वरूपी कामावरून काढून टाकण्याची कारवाई करण्याची भूमिका एसटी महामंडळाकडून घेतली जाण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाकडून आतापर्यंत 918 जणावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.