संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जाची याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील बुधवारी सुनावणी करण्यात आली. सरकारी वकिल आणि नितेश राणे यांच्या वकिलांमध्ये न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला आहे. अखेर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्ल्याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटात आमदार नितेश राणे देखील सहभागी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान नितेश राणे यांनी या प्रकरणात न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी सुरु करण्यात आली आहे. परंतु न्यायालयाच्या वेळे अभावी बुधवारी सुनावणी घेण्यात आली होती. परंतु पुन्हा एकदा न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्यामुळे सुनावणी गुरुवारी होणार आहे.
नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परब याने आपल्या मोबाईलवरून आरोपी सचिन सातपुतेंना ३३ वेळा केला फोन केला असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी केला आहे. तसेच आमदार नितेश राणे व माजी जी प अध्यक्ष गोटया सावंत याना कायद्याचा धाक राहीलेला नाही. गोटया सावंत यांच्यावर २५ गुन्हे दाखल असल्याची बाब ही सरकारी वकिलांनी सुनावणी मध्ये समोर आणली नितेश राणे,सचिन सातपुते एकत्र असल्याचे फोटो सरकारी वकील प्रदिप घरत यांनी कोर्टात सादर केले आहेत.