विधानपरिषदेचे सदस्य असलेल्या प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी अवमानकारक वक्तव्य केलं. यामुळे विधानपरिषद सभागृहाचाच एकप्रकारे अवमान झाला आहे. अशा सदस्यांना तात्काळ निलंबित करावं, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर या आमदाराला फासावर द्या, असं म्हणाले असते, असं सांगत शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी प्रशांत परिचारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.