नवा वाद, मनसेने झेंड्यावर राजमुद्रेचा वापर करू नये

मनसेने झेंड्यावर राजमुद्रेचा वापर करू नये, असं आवाहन आर.आर.पाटील फाउंडेशनकडून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना करण्यात आलं आहे. या अगोदर संभाजी ब्रिगेडने देखील झेंड्यावर राजमुद्रेच्या वापर करण्याबाबत आक्षेप नोंदवलेला आहे.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी जयंती आहे. या निमित्त मुंबईत मनसेचा मेळावा होणार आहे. या दिवशी मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नव्या झेंड्यावर मनसेकडून राजमुद्रेचा वापर केला जाणार असल्याचं समजते. या पार्श्वभूमीवर आर.आर.पाटील फाउंडेशनकडून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पत्र पाठवून यासंदर्भात विनंतीवजा इशार दिला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती