विधान परिषद निवडणूक :नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनाही सर्वोच्च न्यायालयाकडून झटका, मतदानाला परवानगी नाही

सोमवार, 20 जून 2022 (20:31 IST)
महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयानं विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या व्हेकेशन बेंचनं हा निर्णय दिला आहे .न्यायमूर्ती सीटी रवीकुमार आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलीया यांच्या खंडपिठानं हा निर्णय दिला आहे. 
 
दोन्ही नेते सध्या वेगवेगळ्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत.महाराष्ट्रात आज विधान परिषद  निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, ज्यामध्ये देशमुख आणि मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मतदानाची परवानगी मागितली होती. यापूर्वी उच्च न्यायालयाने दोन्ही मागण्या फेटाळल्या होत्या. 
 
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री देशमुख आणि कॅबिनेट मंत्री मलिक यांच्या वकिलांनी याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.विशेष म्हणजे 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत केवळ 285 मते आहेत.कारण मलिक आणि देशमुख न्यायालयीन कोठडीत असून त्यातच शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा मृत्यू झाला.
 
हायकोर्टात काय झालं
मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी दोन्ही नेत्यांची याचिका फेटाळून लावली.न्यायमूर्ती एनजे जमादार यांच्या खंडपीठाने शुक्रवारी संध्याकाळपर्यंत लेखी आदेश तयार करू, असे सांगितले होते.त्यावर उत्तर देताना मलिक यांची बाजू मांडणारे अधिवक्ता अमित देसाई यांनी सोमवारी निवडणूक असल्याने थोडे लवकर आदेश द्यावेत, असे सांगितले.
 
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक न्यायालयीन कोठडीत आहे.तर, ईडीने देशमुख यांच्याविरोधात चौकशी सुरू केली असून, त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.यापूर्वी मुंबई न्यायालयाने राज्यसभा निवडणुकीतही मतदान करण्यास परवानगी नाकारली होती.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती