नवी मुंबईच्या जुईनगर रेल्वे स्टेशन परिसरात सकाळी 15 फूट लांब अजगर आढळून आला. त्यामुळे लोकलला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये दहशत निर्माण झाला. काही लोकांनी सर्पमित्राला फोन करून माहिती दिली. त्यांनी रेल्वे स्टेशनवर दाखल होऊन अजगराला रेस्क्यु करून सुरक्षित स्थानी सोड्यात आलं .शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असे हिंस्र सरपटणारे प्राणी आढळत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
एवढा भलामोठा अजगर पाहण्यासाठी बघणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जुईनगर रेल्वे स्टेशन परिसरात आज सकाळी 15 फूट मोठा अजगर आढळल्याने लोकल ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली. काही प्रवाशी घाबरले. अजगर असल्याची माहिती फोन वरून प्राणी मित्र संघटनेला देण्यात आली.सर्पमित्र लगेच घटनास्थळी हजर झाले. त्यांनी अजगराला पकडून सुरक्षितस्थळी सोडले .