उद्यापासून नशिराबादचा टोलनाका पुन्हा सुरु होणार ; असे असणार दर

मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (16:17 IST)
जळगाव-भुसावळ दरम्यानच्या महामार्गाच्या वापरासाठी आता वाहनधारकांना पैसे मोजावे लागणार आहे. कारण उद्या म्हणजेच बुधवारपासून नशिराबादच्या काही अंतरावर असलेल्या सिमेंट फॅक्टरीजवळील टोलनाका सुरु होणार आहे. यामुळे कुठल्या वाहनासाठी किती दर आकारले जाईल, त्याबाबत नुकतेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दरांबद्दलची सार्वजनिक सूचना जारी केली आहे.
 
असे असणार दर?
त्यानुसार कार, प्रवासी व्हॅन, जीप, हलके मोटार वाहनाच्या एकेरी प्रवासाठी ८५ तर एका दिवसात परतीचा प्रवासाकरिता १३० रुपये आकारले जाणार आहे. त्याशिवाय हलके वाणिज्य वाहन, हलके मालवाहू वाहनाच्या एकेरी प्रवासासाठी १४० रुपये तर परतीच्या प्रवासाकरिता २१० रुपये़, ट्रक व बस एकेरी प्रवासाठी २९५ तर परतीच्या प्रवासाकरिता ४४०़, खोदकाम करणारी, माती वाहून नेणारे उपकरणे, जड बांधकाम यंत्रांच्या एकेरी प्रवासाठी ४६० व एका दिवसाच्या परतीचा प्रवासाकरिता ६९० रुपये आकारले जाणार आहे तर अवजड वाहनांना एकेरी प्रवासाठी ५६० रुपये मोजावे लागणार आहे.
 
सूटही मिळणार
सर्व वाहनांसाठी टोल तिकीट घेतल्यापासून २४ तासांसाठीचा परतीच्या प्रवासाठी २५ टक्के सूट देण्यात आली़ त्याचबरोबर सर्वप्रकारच्या वाहनासांठी टोलशुल्क भरल्याच्या तारखेपासून एका महिन्याकरिता ५० किंवा जास्त एकेरी प्रवास असल्यास त्यात ३३ टक्के सूट मिळणार आहे. टोलनाक्याच्या २० कि.मी. हद्दीतील अवाणिज्य वाहनांसाठी कॅलेंडर महिन्यासाठी स्थानिक पास हा २८५ रुपयांचा असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती