१७ वर्ष जुना भंगार बाजार काढला

नाशिक औद्योगिक  परिसरा जवळ  असलेल्या आणि रहिवासी क्षेत्र म्हणून राखीव असलेल्या जवळपास १०० एकर जागेवरील ३० एकर जागेवर हा सर्वात मोठा भंगार बाजार अनधिकृत रीत्या वसला होता. तर या ठिकाणी सुमारे ८०० भंगार गोदाम आणि दुकाने आहेत. या ठिकाणी परप्रांतीय ३० हजार पेक्षा अधिक कामगार कामाला होते.

हा अनधिकृत ,विवादास्पद भंगार बाजार हटवला जावा या करिता अनेक नागरिक, विविध संस्था आणि याभागातील असलेले समाज सेवक १७ वर्षापासून लढा देत होते. अखेर काही महिन्या पूर्वी सुप्रीम कोर्टाने अंतरिम आदेश दिले आणि आज पासून पोलीस आणि महापालिका यांच्या सयुक्त कारवाईत हा भंगार बाजार हटवायला सुरुवात झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा