नाशिक : घरफोडी कराणारे दोघे आरोपी गजाआड

मंगळवार, 19 जुलै 2022 (09:19 IST)
नाशिक  उपनगर परिसरात भरदिवसा झालेल्या घरफोडी करणा-या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या चोरांकडून ३२ लाख, ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात साडे एकवीस लाखांच्या हिरेजडीत दागिण्यांसह गुह्यात वापरलेल्या दोन कार आणि एक मोपेडचा समावेश आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली. रोहन संजय भोळे (३५ रा.जयप्रकाश सोसा.विद्यानगरी,ना.रोड) व ऋषीकेश मधुकर काळे (२६ रा.पदमिनी सोसा.गंधर्वनगरी,ना.रोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
 
उपनगर येथील संजय ईश्वरलाल बोरा (रा.अश्विनी सोसा.जयभवानीरोड) यांच्या बंगल्यात गेल्या रविवारी घरफोडी झाली होती. त्यात चोरट्यांनी लोखंडी कपाटातील तिजोरीतून सोन्याचांदीचे दागिणे व रोकड लंपास केली होती. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत गुन्हेगारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. गुन्हा करतांना आरोपींनी रिट्स कारचा वापर केला. त्या कारचा शोध घेण्यासाठी एक पथक मुंबईला रवाना झाले. मात्र पोलीसांच्या हाती काही लागले नाही. दुसरीकडे, फुटेज वरून गुन्हेगारांची ओळख पटवण्याचे काम सुरू असतांना युनिटचे कर्मचारी प्रकाश भालेराव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलीसांनी शनिवारी (दि.१६) मोटवाणी रोडवरील उत्सव मंगल कार्यालय परिसरात सापळा रचत रिटस कार मधील दोघा संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हाची कबुली दिली. तसेच गेल्या मे महिन्यात जयभवानी रोड भागातही घरफोडी केल्याचे सांगितले. पोलीसांनी संशयितांकडून २१ लाख ६८ हजार ५०० रुपये किंमतीचे सोने, चांदी, हि-याचे दागिने, चार लाख किंमतीची रिट्स कार, पाच लाख रुपयांची मारूती कंपनीची स्विफ्ट कार, ५० हजार रुपयांची दुचाकी, एक लाख २० हजार किंमतीचे दोन मोबाईल असा ३२ लाख ३८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाने दोघा संशयितांना मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोपट कारवाळ,हवालदार प्रकाश भालेराव,शंकर काळे, देवकिसन गायकर,सुगन साबरे,अनिल लोंढे,नंदकुमार नांदुर्डीकर,गुलाब सोनार,प्रकाश बोडके,संपत सानप,चंद्रकांत गवळी,विजय वरंदळ,यादव डंबाळे,राहूल पालखेडे,मधूकर साबळे,संतोष ठाकूर,अतुल पाटील आदींच्या पथकाने केली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती