नाशिक :रेल्वे रुळांवर सेल्फी काढताना दोन मुलांना रेल्वेची धडक, दोघांचा मृत्यू

सोमवार, 10 जून 2024 (09:57 IST)
सध्या तरुण वर्ग रिल्सच्या नादात काहीही करतात. लाईक्स आणि व्यूजस साठी ते कोणताही धोका पत्करतात. पण अनेकदा त्यांना हे करताना आपला जीव गमवावा लागतो. रेल्वे नेहमी रुळावरून चालू नये रूळ ओलांडू नये अशी सूचना देतात तरीही काही जण बेजबाबदारपणे आपल्या जीवाला धोक्यात टाकून रेल्वे रूळ ओलांडतात आणि त्यावर रिल्स बनवतात.

नाशिक मध्ये दोन तरुणांना रेल्वे रुळावर रिल्स बनवणे महागात पडले त्यात दोघांना रेल्वेची धडक बसून दोघांचा मृत्यू झाला. संकेत कैलास राठोड आणि सचिन दिलीप कारवार असे या मयत तरुणांची नावे आहे. 
 
सदर घटना  शनिवारी संध्याकाळी वालदेवी नदीच्या पुलाजवळ रेल्वे ट्रॅकवर घडली.संकेत आणि सचिन हे दोघे रेल्वे रुळावर उभे राहून सेल्फी घेत होते आणि रिल्स बनवत होते. दोघांना मागून ट्रेन आल्याचे समजले नाही आणि दोघांना रेल्वेची जोरदार धडक बसली त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.  
घटनेची माहिती मिळतातच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. दोघे हे 11 वीचे विद्यार्थी होते. 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती