नाशिकचे जवान अर्जुन तुकाराम गांगुर्डे यांचे हदय विकाराच्या झटक्याने निधन

शनिवार, 11 जून 2022 (17:04 IST)
चांदवड तालुक्यातील कळमदरे येथील भारतीय सेनेत (CISF) चे जवान अर्जुन तुकाराम गांगुर्डे (51) हे ओडिशात कर्तव्य बजावता असताना हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.अर्जुन गांगुर्डे हे 1991 साली भारतीय सैनदलातील CISF विभागात भरती झाले होते.

चांदवड तालुक्यातील कळमदरे गावातील अर्जुन तुकाराम गांगुर्डे यांचे गुरुवारी ओडिशा राज्यातील राउरकेला येथे केंद्रीय औदयोगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदावर कर्तव्य बजावत असताना हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. घटनेची माहिती त्यांच्या गावी चांदवडला मिळतातच गावात शोककळा पसरली आहे. ते सध्या आपल्या कुटुंबासह नाशिकात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. 
अर्जुन हे 1991 साली भारतीय सैन्यदलातील CISF विभागात भरती झाले आणि सध्या हेड कॉन्स्टेबल पदावर कर्तव्य बजावत होते. 

त्यांचे पार्थिव आज संध्याकाळी त्यांच्या मूळगावी चांदवड तालुक्यातील कळमदरे गावात येणार असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती