राज्यात नाशिक सर्वाधिक थंड शहर, पारा ११.२ अंश सेल्सिअस

शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (15:40 IST)
राज्यात थंडी वाढली असून शुक्रवारी निफाडचा पारा ८.५ अंश तर नाशिकचा पारा ११.२ अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली. राज्यात नाशिक सर्वाधिक थंड शहर ठरले.

गेल्या तीन चार दिवसांपासून नाशिकचे तापमानाचा पारा १४ अंशावर आहे. नाशिक शहर आणि आसपासचा परिसर हिरवाईने नटलेला आहे त्याच सोबत इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुका, निफाड याभागत पर्यजन्यमानही चांगले होते. त्यामुळे मान्सून संपताच या संपूर्ण परिसरात गुलाबी थंडी पडते. वातावरण आल्हाददायक बनते. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक थंडीच्या भागात नाशिकची नोंद होते. 
 
यंदाच्या मोसमात राज्यभरात चांगल्याच पावसाची नोंद झाल्याने येणार्‍या काही महिन्यात पार अजून खाली जाण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिक आणि लगतच्या भागामध्ये येत्या दोन ते तीन दिवसांममध्ये तापमानाचा पारा घसरू शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढू लागली आहे. उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यातही थंडी वाढण्याची शक्यता आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती