खास बाब म्हणजे महिंद्राच्या XUV700 या कारच्या प्रकल्पातील तब्बल 700 पुरुषांची टीम त्या सांभाळतात. अनुष्का यांनी 12 वर्षांपूर्वी नाशिकच्या महिंद्रा प्रकल्पात नोकरी सुरू केली. त्यावेळी त्या पहिल्या आणि एकमेव महिला अधिकारी नाशिकच्या प्रकल्पात होत्या. उत्कृष्ट कर्तव्य बजावत असल्यामुळे कंपनीने त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या वेळोवेळी दिल्या. आणि आता त्या एका विभागाच्या प्रमुख आहेत. आनंद महिंद्रा यांनी अनुष्का यांच्याबद्दल म्हटले आहे की, त्यांची कथा ही एक उदयोन्मुख कथा आहे. स्त्री-पुरुष समानता साध्य करण्यासाठी आम्हाला मोठा पल्ला गाठायचा आहे. आम्ही यात वेगाने पुढे गेलो नाही तर अनेक प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्व आम्ही गमावू. अनुष्का ही त्यापैकीच एक आहे. दर सोमवारी आनंद महिंद्रा हे सकारात्मक आणि उदयोन्मुख व्यक्तिमत्वांची ओळख करुन देतात. त्यात आज त्यांनी अनुष्का यांची निवड केली आहे.दरम्यान, आनंद महिंद्रा यांच्या कौतुकामुळे अनुष्का यांचे कार्य संपूर्ण जगभरातच पोहचले आहे.