प्रकल्प होऊ देणार नाही; अन्यथा खासदारकी सोडू

गुरूवार, 28 जून 2018 (11:21 IST)
नाणारला एकही दगड रचू देणार नाही, अशा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. तसेच वेळ पडल्यास फक्त शिवसेनेप्रमाणे धमकी देणार नाही तर खासदारकीचा राजीनामा फेकून देईन, असे राणेंनी म्हटले आहे. रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्यावतीने ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.
 
याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार मुद्यावर आक्रमक भूमिका घेत केंद्रीय पेट्रोलियममंत्री यांची भेट नाकारली. करारावर स्वाक्षरी करण्यात आल्यानंतर बोलताना उद्धव ठाकरेंची भेट घेऊन नाराजी दूर करु, असे धर्मेंद्र प्रधान बोलले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर भेट कशासाठी अशी विचारणा करत भेट नाकारली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती