दुपारी 3 वाजेचा बाहुबलीचा शो पाहण्यासाठी गेलेल्या ससाणे कुटुंबियांच्या घरातून 8 तोळे सोनं आणि 30 हजार रुपये चोरांनी लंपास केले आहे. ससाणे कुटुंबीय हिरावाडी परिसरात राहतात. ससाणे कुटुंबियांना महिष्मती नगराची ही सफर चांगलाच महागात पडल्याची चर्चा शहरात रंगली आहे.