नागपूर: लॉकडाऊनची अमंलबजावणी आणखी कठोर, CRPF तैनात

शनिवार, 23 मे 2020 (17:08 IST)
राज्यात मुंबई, पुणे आणि औरंगाबादनंतर नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. नागपुरात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 409 वर पोहोचली आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 298 आहे.
 
आजपासून येथे CRPF तैनात करण्यात आलं आहे. नागपूर शहरात एकूण 80 जवानांची तुकडी दाखल झाली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी महाराष्ट्र पोलिस रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. त्यांना विश्रांती देण्यासाठी CRPF जवानांची केंद्राला मागणी केली गेली होती. 
 
नागपुरातही पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातील सर्व आठ हजार पोलिसांची आरोग्य तपासणी केली जात आहे. दरम्यान 25 मे रोजी रमजान ईद आहे. ईदमुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आखणी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्यात लॉकडाऊनची अमंलबजावणी आणखी कठोर करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती