मुंडे यांनी निवडणूक प्रक्रियेची फसवणूक केली, त्यांच्यावर गुन्हा नोंदवा

शनिवार, 16 जानेवारी 2021 (09:06 IST)
सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रक्रियेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
 
धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांना आणखी दोन मुले असल्याचे नमूद न करून फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंडसंहिता कलम ४२० अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी पाटील यांनी याचिकेत केली आहे. 
 
मुंडे यांनी हेतुपूर्वक ही बाब लपवली.  आयपीसी ४२० अंतर्गत त्यांनी गुन्हा केला आहे. तसेच लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गतही गुन्हा केला आहे. ही बाब उघडकीस आल्यावर मी परळी (बीड जिल्हा) येथील संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. पोलीस महा संचालक व मुख्य निवडणूक आयुक्तांनीही मी नोंदविलेल्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे ही याचिका दाखल केली आहे, असे पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती