मिळालेल्या माहितीनुसार, चेतनेचे आपल्या पत्नीसोबत वाद सुरु होते. शेजारचे काही जणं पत्नीला भडकवतात आणि मग ती आपल्याशी वाद घालते असे चेतनला वाटायचं त्याचे नेहमी शेजाऱ्यांशी वाद होत होते. शुक्रवारी रागाच्या भरात येऊन भर दुपारी इमारतीच्या गॅलरीत त्याने शेजारच्यांवर सपासप धारदार चाकूने वार केले. या त्याने 5 जणांवर हल्ला केला या मध्ये दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना इमारतीच्या खाली उभा असलेल्या एका नागरिकाने केले आहे. घटनेच्या वेळी नागरिकांनी आरडाओरड केली. पण चेतनने कोणालाही जुमानले नाही आणि चाकूने सपासप वार केले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी चेतनला अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.