ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी तळेगावजवळच्या उर्से टोलनाक्यावरच्या आयआरबी कर्मचारी आणि व्यवस्थापकांना खडे बोल सुनावले. पैसे घेऊनही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक असुरक्षित आहे, आणखी किती जीव घेणार, असा जाब विचारला आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करताना सिंधुताई सपकाळ यांच्या डोळ्यादेखतच भीषण अपघात होता होता टळला. त्या गाडीमध्ये लहान मुलांसह वीसच्या जवळपास महिलांचा समावेश होता. हा प्रसंग प्रत्यक्ष घडताना पाहून सिंधुताई उद्विग्न झाल्या. उर्से टोलनाक्यावर थांबून ‘आणखी किती लोकांचे तुम्ही जीव घेणार?’ अशा शब्दात सिंधुताईंनी जाब विचारला. पुढील 8 दिवसात प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर हजारो नागरिकांना महामार्गावर उतरवून आंदोलन छेडण्याचाही इशाराही त्यांनी दिला.