मेट्रो -3 प्रकल्पाला हिरवा कंदील

शनिवार, 6 मे 2017 (09:37 IST)

मेट्रो -3 प्रकल्पाला मुंबई हायकोर्टानं हिरवा कंदील दाखवला आहे. मुंबईत वृक्षतोडीवरील लावलेली बंदीही उठवली आहे. मात्र यावेळी याचिकाकर्त्यांच्या विनंतीनुसार निर्णयाला 10 दिवसांची स्थगिती देत त्यांना सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.

'वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना होणारा त्रास लक्षात घेता मुंबईत मेट्रो आलीच पाहिजे. वाहतूककोंडी कमी करण्यासाठी मेट्रो-३ प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र याबरोबरच झाडाचे की मानवाचे आयुष्य जास्त महत्त्वाचे आहे, हे ठरवण्याचीही वेळ आली आहे', असे निरीक्षण करण्यात आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा