साहसी क्रीडा प्रकार म्हणजे काय?: हायकोर्ट

सोमवार, 17 जुलै 2017 (16:30 IST)

पाच वर्षाच्या मुलाला उंचीवर चढवणे यात कोणतं साहस आहे? साहसी क्रीडा प्रकार म्हणजे काय? असे सवाल करत हायकोर्टाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच भाजप आमदार आशिष शेलार यांनी यापुढे दहीहंडीच्या कार्यक्रमाला जाताना काळजी घ्यावी, असंही हायकोर्टाने सुनावलं. दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकार म्हणून घोषित करा, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी दहीहंडीत लहान मुलांच्या समावेशाला विरोध करत, हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा