मुंबई हायकोर्टाकडून पी1 पॉवर बोट स्पर्धेला हिरवा कंदिल

बुधवार, 1 मार्च 2017 (17:13 IST)
मुंबई हायकोर्टाने पी1 पॉवर बोट स्पर्धेला हिरवा कंदिल दाखवला आहे. मात्र याबाबत राज्य सरकारला फटकारले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा या घटनेशी काही संबंध आहे की नाही? केवळ ग्लोबलायझेनशच्या गप्पा मारु नका अशी फटकारदेखील मुंबई हायकोर्टाने लगावली आहे. आंतरराष्ट्रीय सोहळ्याकडे संकुचित दृष्टीकोनातून पाहू नका. आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईची प्रतिमा मलिन होईल अशी भूमिका घेणे चुकीचे आहे. शिवाय, राज्यात कित्येक बेकायदेशीर बांधकाम सुरू आहेत, त्यावरही लक्ष द्या,' अशा शब्दांत हायकोर्टाने राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. कोर्टाच्या निर्णयामुळे मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे 3 ते 5 मार्चदरम्यान पी 1 पॉवर बोट रेसिंग स्पर्धा रंगणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा