Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांवरून मनसे आक्रमक

शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 (16:37 IST)
Mumbai-Goa Highway:  मुंबई -गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहे. अभियंता दिनानिमित्त सरकार कडून आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई ते षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर आंदोलन केलं .मुंबई गोवा महामार्गावर सध्या एका लेनचे काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झाल्यावर देखील रस्त्यावर खड्डे दिसत आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही आणि सत्कार कशाला केला जात आहे.

मुंबई महामार्गावर रस्त्याचे काम पूर्ण करा अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली असून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करणात आले. आंदोलकांनी काळे झेंडे घेऊन घोषणाबाजी केली. पोलिसांना या आंदोलनाची माहिती मिळतातच ते स्थळावर दाखल झाले आणि त्यांनी संदीप देशपांडे सह आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. 
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती