बस चे पंक्चर टायर बदलायला गेले आणि वाहक चालकाचा मृत्यू झाला

बुधवार, 16 ऑक्टोबर 2019 (15:57 IST)
पुणे : एसटी बसचा टायर पंक्चर झाल्याने टायर बदलण्यासाठी उतरलेल्या वाहक चालकाला ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबई- बेंगळूरु महामार्गावर बावधन (चांदणी चौक) जवळ हा अपघात झाला.
 
मुंबई सेंट्रल ते भोर ही एसटी बस बावधनजवळ आली असता तिचा टायर पंक्चर झाला. बसचा टायर बदलण्यासाठी चालक मोहन बांदल आणि वाहक शंकर चव्हाण यांनी बस रस्त्याच्या कडेला लावली. टायर बदलण्यासाठी जॅक लावत असताना मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक एसटीला दिली. या जोरदार धडकेत मोहन बांदल आणि शंकर चव्हाण गंभीर जखमी झाले. तर, काही प्रवासीही जखमी झाले.
 
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी चालक मोहन बांदल यांना मृत घोषित केले. तर, वाहक शंकर चव्हाण यांनी उपचार सुरू असता प्राण सोडले. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक राजीव सु्ंदरम याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती