मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते झोपेतसुद्धा माझं नाव घेतात”, अशी खोचक टीका शरद पवारांनी मोदी-शहांवर केली. ते पुण्यात बोलत होते. यावेळी पवारांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुनही सरकारवर निशाणा साधला. “राज्यात आतापर्यंत 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यांनी कलम 370 हटवलं. 
 
तुमच्यापैकी कोण तिथे शेती करायला जाणार आहे. यांच्याकडे सांगायला काही नाही, म्हणून कलम 370 हटवलं असं सांगतात. शेतकरी आत्महत्या, कारखाना बंद, महिला अत्याचार यावर फक्त 370 कलम इतकचं सांगितलं जात आहे,” असेही ते यावेळी म्हण “गृहमंत्री अमित शाह येथे येऊन आम्हाला विचारतात की तुम्ही काय केल. मात्र मी तुम्हाला विचारतो की तुम्ही पाच वर्षांपूर्वी अमित शाहांचं नाव तरी ऐकलं होतं का?” असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी विचारला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती