२२ जानेवारी रोजी आयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी नागरिकांना केले आहे. तसेच या राम मंदिर सोहळ्या निमित्त सुजय विखे पाटील यांच्या वतीने 'मेरे घर आये श्रीराम' ही योजना देखील आखण्यात आली आहे.