राजकारणातलोक प्रतिनिधींचा संपर्क चांगला असल्यामुळे ते मतदारसंघातील संपर्कात किंवा इतर लग्नसमारंभात सहभागी होतात. शिरूर चे खासदार अमोल कोल्हे यांनी एका लग्नसमारंभात सहभागी होऊन वरातीत ताल धरून डान्स केला आहे. त्यांनी आपल्या खासगी पीएच्या लग्नात नवरदेवासह ताशा, पिपाणी असे ग्रामीण वाद्यावर ठेका धरत डान्स केला आहे. त्यांचा डान्सचा हा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.