नागपूरमध्ये 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात114 हून अधिक आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे आणि तेरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेत दगडफेक झाली आणि वाहनांना आग लावण्यात आली. त्या दिवशी पवित्र चादर जाळण्यात आल्याची अफवा पसरली होती. नागपूरचे पोलिस आयुक्त रविंदर सिंघल यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, "या घटनेत सहभागी असलेल्यांवर सतत कारवाई केली जात आहे.
या घटनेसंदर्भात तेरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि 114 हून अधिक आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. काही प्रकरणांमध्ये ते (आरोपी) बाहेरचे होते तर काही नागपूरचे होते." सोमवारी नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नागपूर दंगल प्रकरणातील आरोपी युसूफ शेख आणि फहीम खान यांच्या घरांवरील बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले.
राज्याचे गृहमंत्री असलेले फडणवीस यांनी यापूर्वी म्हटले होते की, त्या दिवशी पवित्र 'चादर' जाळण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे हिंसाचार झाला. हिंसाचारात झालेल्या नुकसानाची भरपाई दंगलखोरांना करावी लागेल असेही त्यांनी सांगितले.जर त्यांनी पैसे दिले नाहीत तर त्यांची मालमत्ता विकून पैसे वसूल केले जातील. गरज पडल्यास बुलडोझरचा वापर देखील केला जाईल.