हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत बहुतेक ठिकाणी किंचित पावसाच्या शिडकाव होऊन गेला. अन्यथा समाधानकारक पाऊस झालेलाच नाही. पुढील 4 दिवसांमध्ये देखील फारशी प्रगती अपे<क्षित नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अद्याप 3 इंच पाऊस सरासरी कमीच पडलेला आहे. मान्सून अचानक कमकुवत झालेला आहे. गोव्याच्या पूर्वेकडून म्हणजेच बंगालच्या महासागरातून नव्याने पावसाचे ढग पश्चिमेकडे सरकत असून साधारणतः 19 जूनपर्यंत गोव्यात जोरदार पावसाची शक्यता.