हिंदूराष्ट्र बनवण्यासाठी भागवतांनी राष्ट्रपती व्हावे: ठाकरे

मोहन भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले असले तरी शिवसेनेने पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत यांचे नाव पुढे केले आहे. हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरावे असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.  
 
भारत हिंदू राष्ट्र व्हावे, अशी इच्छा आहे. आता बर्‍याच वर्षांनी देशात सत्तापरिवर्तन झाले असून हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोहन भागवत यांनी राष्ट्रपती होणे गरजेचे आहे असे ठाकरेंनी म्हटले आहे.
 
विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुदत जुलैमध्ये संपत आहे. त्यामुळे जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होईल. देशातील सर्व खासदार व आमदार या निवडणुकीत मतदान करू शकतात. विधान परिषदेच्या आमदारांना मतदानाचा अधिकार नसतो. लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या खासदारांना मतदानाचा अधिकार असतो. या निवडणुकीमध्ये शिवसेनेची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे.

वेबदुनिया वर वाचा