नाशिक महापालिकेने सर्व यंत्रणांच्या सहभागाने सर्व नागरिकांचे लसीकरणाचे लक्ष्य गाठले असताना आता पुढील टप्प्यामध्ये ही मोहीम संपूर्णपणे सामान्यांमध्ये नेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. आतापर्यंत पालिकेची वेगवेगळ्या ठिकाणी केलेली केंद्रांची उपलब्धता आता टप्प्याटप्याने कमी करून मोबाइल व्हॅनच्या मदतीने सामान्यांपर्यत लसीकरण मोहीम नेण्यात येणार आहे.
लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी आता मोबाईल डेफिनेशन हँडसेट नाशिककरांच्या दारी येणार आहे. नाशिक मनपाच्या प्रत्येक वार्डात लवकरच किमान दोन मोबाईल व्हेरिफिकेशन व्हॅन उपलब्ध करण्यात येणार असून लसीकरण शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे अशी माहिती पालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक मध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन लस देणे अपेक्षित असल्याने आता मोबाईल व्हॅनद्वारे हे लसीकरण पुरवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात अद्यापही अनेक नागरिकांचे दुसरा डोस झालेला नाही. अशांचे लसीकरण मोबाईल व्हॅक्सिनेशन व्हॅनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दाटीवाटीची वस्ती, झोपडपट्ट्यांमधील रहिवासी लक्ष देण्यासाठी पुढे येत नसेल तर त्या त्या ठिकाणी मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांमध्ये मोबाईल व्हॅनमधून लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.