अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं असून ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली असल्याची टीका केली आहे. “पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे धमक्यांचे फोन येत आहेत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे,” असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.