राज ठाकरे यांचा जबरा फॅन पाहिला का ?

शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (15:42 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जबरा फॅनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या जबरा फॅनने चक्क हातावर राज ठाकरे यांच्या नावाचा ‘राजसाहेब ठाकरे’ असा जबरदस्त टॅटू काढला आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. एवढेच नव्हे तर जेव्हा राज ठाकरेंना हा टॅटू दाखवण्यात आला तेव्हाचा त्या दोघांमधील झालेला संवाद चर्चेत आला आहे.
 
राज ठाकरेंचा हा जबरा फॅन मनसेचा कार्यकर्ता असून त्याचे नाव आकाश तुपे असे आहे. आकाश तुपेने जेव्हा हा टॅटू राज ठाकरेंना दाखवला तेव्हा राज ठाकरे म्हणाले की, ‘अरे हा टॅटू काढला आहे तर तुला दुसऱ्या पक्षात घेणार नाही. मग पुढे काय करणार?’ यावर कार्यकर्ता आकाश तुपेने उत्तर दिले की, ‘साहेब, मरेपर्यंत मनसे आणि तुम्ही आमचे दैवत आहात. सोडून कसे जाणार?’

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती