मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा 53 वा वाढदिवस

सोमवार, 14 जून 2021 (09:16 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 53 वा वाढदिवस आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करू नये, अशी आग्रहाची विनंती केली होती. तरीही कार्यकर्त्यांनी उत्साहात राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' बंगल्याच्या गेटवर फुलांची सजावट केली आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसेकडून खास व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 
वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी त्यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागते. परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, शुभेच्छा देण्यासाठी कृष्णकुंजवर येऊ नये,असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं.  
 
तसंच राज ठाकरे यांच्या  53 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवी मुंबई मनसेच्या वतीने 53 हजार घरांमध्ये मोफत पुस्तके संपूर्ण वर्षभर भेट देण्याचा संकल्प नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केलेला आहे. मराठी 100 पुस्तकांची यादीच मनसेने प्रसिद्ध केलेली आहे. त्यामधील आपल्या आवडत्या पुस्तकाची नोंदणी करण्याचे आवाहन मनसेने केले आहे. सक्षम समाज घडवण्यास मदत म्हणून तसंच शहरामध्ये वाचन संस्कृती रुजावी याकरिता नवी मुंबई मनसेचा हा छोटासा प्रयत्न असल्याचं काळे यांनी म्हटलं. सदर पुस्तकांची नोंदणी करण्याकरिता मनसेने दोन क्रमांक ९०९०५०५०६७ / ८१०८१८१००७ प्रसिद्ध केलेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नागरिक आपले आवडते पुस्तक नोंदवू शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती